Blog
कॉपीरायटिंग म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटतं कॉपीरायटिंग म्हणजे ट्रेडमार्क किंवा ओवनरशिपच्या संदर्भात असलेली संकल्पना असे काहीतरी. कॉपीरायटिंग ही संकल्पना आपण कंटेंट रायटिंग किंवा शाळेमध्ये-कॉलेजमध्ये शिकलेल्या लेखनकलेपेक्षा खूप वेगळी असते.
कॉपीरायटिंग ही एक अशी कला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही शब्दाचे रुपांतर पैशामध्ये करू शकता. होय! तुम्ही बरोबर वाचले... थोडक्यात सांगायला गेलं तर ही कला एका सेल्समॅन सारखी काम करते. ज्याप्रकारे एक उत्कृष्ट सेल्समॅन त्याच्या बोलण्याच्या कलेच्या मदतीने ग्राहकांसोबत नाते जुळवून सेवा किंवा वस्तू विकू शकतो. अगदी त्याचप्रमाणे कॉपीरायटिंग ही एक अशी कला आहे जी एका सेल्समॅनसारखे मार्केटिंगचे काम करते. पण सेल्समॅनला प्रत्येक व्यक्ती सोबत वन-टू-वन बोलावे लागते आणि त्याला कन्व्हिन्स करावे लागते. याठिकाणी व्यवसायवाढीमध्ये मर्यादा येते. पण कॉपीरायटिंगच्या मदतीने तुमच्या अनुपस्थितीत देखील 24 x 7 ग्राहकांपर्यंत तुमच्या सेवेबद्दल किंवा प्रॉडक्टबद्दल माहिती पोहोचवून त्यांच्याशी चांगल्या प्रकारचे नाते तयार करून त्यांना ते प्रॉडक्ट किंवा सेवा विकण्यास मदत होते. म्हणजे जरी तुम्ही झोपेत असाल तरीदेखील तुमची ही सेल्स कॉपी तुमच्यासाठी काम करत असते. अशाप्रकारे जेवढे तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचाल तेवढ्या प्रमाणात तुमच्या सेवेचा किंवा वस्तूचा सेल होईल. त्यामुळे कॉपीरायटिंगला प्रत्येक व्यवसायामध्ये उच्च दर्जाचे स्थान असते. आता तुम्हाला कॉपीरायटिंगचे महत्व समजले असेल.
पण 96 टक्के लिहिलेल्या सेल्स कॉपी व्यर्थ ठरतात आणि वस्तू किंवा सेवा विकण्यात अपयशी ठरतात, काय कारण असेल बरं याच्यापाठीमागचे?
याच्यापाठीमागची व्यवसायिकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ज्यावेळेस ते सेल्स कॉपी लिहितात त्यावेळेस ते स्वतःबद्दल सांगण्यात खूप वेळ घालवतात. पण ज्यावेळेस कोणताही ग्राहक तुमची सेल्स कॉपी वाचत असतो त्यावेळेस त्याला तुमच्याबद्दल काहीच देणंघेणं नसतं. ते फक्त तुमची जी काही सेवा किंवा प्रॉडक्ट आहे ती त्यांची समस्या कशाप्रकारे सोडवू शकते हेच पाहत असतात. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही सेल्स कॉपी लिहित असता त्यावेळेस तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेमुळे ग्राहकांची समस्या कशा प्रकारे सोडवण्यास मदत मिळू शकते यावरती जास्त भर दिला तर तुमची सेल्स कॉपी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण कोणताही ग्राहक त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेला असतो. त्यामुळे त्यांच्या या समस्येवरती जास्त फोकस करा आणि सेल्स कॉपी लिहिताना एक काळजी घ्यायची कमीत कमी शब्दात, साधी आणि वाचायला मजेशीर ठरणारी कॉपी लिहायची.
फेसबुक ऍड, लँडिंगपेज, गुगल ऍड, सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, मेसेजिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला कॉपी रायटिंग ची गरज पडते. थोडक्यात सांगायला गेलो तर ज्या ठिकाणी तुमचा संभाव्य ग्राहक आहे अशा प्रत्येक ठिकाणी त्या संभाव्य ग्राहकांना आपल्या प्रॉडक्ट किंवा सेवा यांच्याकडे आकर्षित करून कस्टमर मध्ये रुपांतर करण्यासाठी कॉपी रायटिंग महत्त्वाची भूमिका बजावते.
सेल्स कॉपी लिहिताना Features आणि Benefits या दोन संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. Features म्हणजे तुमचा प्रॉडक्ट किंवा सेवा काय आहे आणि Benefits म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेमुळे ग्राहकांच्या समस्येचे निरसन कशाप्रकारे होऊ शकते. सेल्स कॉपी लिहिताना नेहमी Features वर भर न देता Benefits वर जास्त भर द्यायचा कारण हेच तर तुमच्या ग्राहकांना पाहिजे असते.
उदाहरण: आपण एक उदाहरण घेऊ सुरुवातीला वायर असलेली हेडफोन असायचे. हेडफोन कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला ते मोबाईलला जोडावे लागत होते. ज्या वेळेस हेडफोन कंपन्यांनी वायरलेस हेडफोन बाजारात आणलं त्यामुळे मोबाईलला हेडफोन कनेक्ट करण्यासाठी वायरची गरज लागत नव्हती. कंपन्यांनी जाहिरातीमध्ये अशी टॅगलाईन वापरली "आता अतिरिक्त वायरांची झंझट नको", यामध्ये त्यांनी कुठेही वायरलेस हा शब्द वापरला नाही कारण वायरलेस हा शब्द हेडफोनच्या Features च्या संदर्भात येतो आणि "आता अतिरिक्त वायरांची झंझट नको" ही लाईन हेडफोनमुळे ग्राहकांना होणाऱ्या Benefits संदर्भात आहे. कारण ही एक लोकांची समस्या आहे आणि ती लाईन त्या समस्येवरती आधारित आहे. त्यामुळे जाहिरात लिहिताना नेहमी प्रॉडक्टच्या Features बद्दल न लिहिता त्याच्या Benefits बद्दल लिहिल्याने जाहिरात अधिक प्रभावशाली ठरते.
तुमची हेडलाईन ही अशी असली पाहिजे की जिच्या मदतीने तुमच्या ग्राहकांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजे. हेडलाईनमध्ये नेहमी, प्रश्न विचारणे, आकड्यांचा वापर करणे यावरती भर द्या.
उदाहरण: आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे बनवायचे? आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनण्याचे 7 मंत्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे 7 रहस्य जे श्रीमंत लोक तुम्हाला सांगत नाही.
तुमची सेवा किंवा प्रॉडक्ट वापरल्याने ग्राहकांना कसा फायदा होणार आहे, हे तुमच्या ग्राहकांना माहीत झाले पाहिजे.
या भागांमध्ये तुमच्यामध्ये असे काय आहे ज्यामुळे तुमचे ग्राहक इतर लोकांकडे न जाता तुमच्यावरती विश्वास ठेवतील याबद्दल लिहायचे. जर तुम्ही खूप दिवसांपासून व्यवसायामध्ये असाल तर तुमचा प्रवास नक्कीच शेअर करा. उदाहरणासाठी, मी या व्यवसायामध्ये पंधरा वर्षांपासून असल्याने कोणत्या टेक्निक काम करतात आणि कोणत्या नाही, त्याचबरोबर कोणत्या चुका टाळायला पाहिजे हे मला समजलं आहे. अशा प्रकारे वाक्यरचना तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे वाचताना ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल. याबद्दलच्या त्यांच्या मनामधील शंका दूर होतील. त्याचबरोबर जर तुमच्याकडे काही Case Study असतील तर त्यांचा देखील वापर तुम्ही करू शकता.
तुम्ही कशाप्रकारे तुमच्या ग्राहकांची समस्या सोडवणार आहात, त्याचबरोबर याचे फायदे काय आहेत आणि ग्राहकांच्या मनामधील शंकांचे निरसन करणे.
कमीतकमी शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये तुमच्या सेवेचा किंवा वस्तूचा फायदा. यामध्ये Features आणि Benefits ला एकत्र करून तुम्ही छोटेछोटे वाक्य टाकू शकता.
ज्या लोकांना सेवा किंवा वस्तू वापरली आहे त्यांचा तुमच्याबद्दलचा प्रतिसाद कसा आहे याचा उल्लेख या भागामध्ये करणे.
ज्यावेळेस ग्राहक तुमच्या वस्तू किंवा सेवेसाठी पैसे भरणार आहे त्याच्याबदल्यात त्याला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहे याबद्दल या भागामधील लिहायचे.
उदाहरण: तुम्हाला कॉपीरायटिंग शिकायची आहे?
तुमच्याकडे दोन पर्याय आहे.
पहिला पर्याय: तुम्ही स्वतः रिस्क घ्या, स्वतःची जाहिरात लिहून तिला पब्लिश करा. जर ती योग्यरीत्या चालली नाही तर पुन्हा नवीन तयार करा आणि पुन्हा टेस्टिंग करा. यामध्ये तुमचे पैसे तर जातीलच पण त्यासोबत तुमचा बहुमूल्य वेळ देखील वाया जाईल, ज्याची किंमत ही पैशापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. ज्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर देखील होईल.
दुसरा पर्याय: कॉपीरायटिंग अशा व्यक्तीकडून शिका ज्याला या क्षेत्रातील अनुभव आहे. त्याचबरोबर त्याने स्वतः जाहिरात तयार करून टेस्टिंग केली आहे की कोणती जाहिरात काम करू शकते आणि कोणती नाही. यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच त्याचसोबत तुमचा बहुमूल्य वेळ देखील वाचेल.
वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची योग्य वेळ हीच का आहे? याच्या संदर्भात लिहिणे.
कॉपीरायटिंग हे कोणतीही वस्तू किंवा सेवा सेल करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे, पूर्ण स्टडी करून, विचार करून कॉपीरायटिंग करणे खूप गरजचे आहे, तरच त्या कॉपीरायटिंगचा फायदा होवू शकतो.
आशा करतो की हा सीक्रेट फॉर्मुला तुम्हाला उत्तम सेल्स कॉपी लिहिण्यासाठी मदत करेल.
जर तुम्हाला व्यवसाय डिजिटल कसा करायचा, डिजिटल मार्केटिंगचा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा? आणि त्याचबरोबर डिजिटल सिस्टम कशा तयार करायच्या हे शिकायचे असेल तर आमचे पुढील लाइव्ह आणि फ्री वेबिनार अटेंड करा . >> Webinar Link
SHARE
माझा विषयी ...
नमस्कार 👋 मी जोतीराम सपकाळ, महाग्रोथचा संस्थापक आणि डिजिटल कोच, या ब्लॉग वर तुम्हाला व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्याविषयी सविस्तर माहिती मिळेल.
फ्री लाईव्ह वेबिनार
मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला
फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....
फ्री लाईव्ह वेबिनार
मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटली करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला
फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....
फ्री लाईव्ह वेबिनार
मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला
फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....
© 2022 Jotiram Sapkal - Digital Coach. All Rights Reserved